कल चाचणीनंतर योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन ©
कल चाचणीनंतर योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन © आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात योग्य करिअर निवडणे हे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाचे आणि आव्हानात्मक कार्य आहे. अनेकदा विद्यार्थी आपल्या आवडीनिवडी आणि क्षमतांची योग्य प्रकारे जाणीव न ठेवल्याने चुकीच्या क्षेत्राची निवड करतात. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना अडचणी येऊ शकतात. करिअरविषयक चाचणी विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, आवड, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करून त्याला योग्य करिअर पर्याय निवडण्यास मदत करते. पण फक्त चाचणी पुरेशी नसते तर चाचणीतील निकषाधारे मार्गदर्शन कारेयर निवडीसाठी उपयुक्त आणि निर्णायक ठरते. मागील लेखात आपण पाहिले की कलचाचणी ही विद्यार्थ्यांच्या करीअर निवडीचा पर्याय कशापद्धतीने ठरते. ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्यावर कल चाचणी शिवाय निवडलेले एखादे करिअर बदलण्याची वेळ येते, या समस्येवर उपाय म्हणून कल चाचणी (Aptitude Test) आणि त्यानंतरचे तज्ज्ञ मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरते. ह्या लेखात आपण पाहणार आहोत, कलचाचणीचा अचूक अर्थ लाव...