Careers in Air Force - वायुदलातील करिअरर्स च्या सुवर्णसंधींचे प्रवेशद्ववार - AFCAT Entrance : ✈🚁 ©
भारतीय वायुदलाचा जगातील सर्वोत्कृष्ट वायुदलांमध्ये समावेश होतो. वायुदलाने गेल्या अनेक दशकतात, विविध युध्द आणि इतर आणिबाणिच्या प्रसंगात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. अशा ठिकाणी करिअरची संधी मिळणं, ही एक मोठीच कामगिरी ठरते. वायुदलामध्ये विविध प्रकारच्या सेवा-कार्यांसाठी दरवर्षी नियमितपणे भरती केली जाते. महत्वाकांक्षी आणि पराक्रम गाजवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी - तरुण - तरुणींनी या करिअर पर्यायाचा अवश्य विचार करावा/करायला हवा. AFCAT म्हणजे काय? AFCAT काय आहे ? 🔰AFCAT (एफकॅट): एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट- ही परीक्षा भारतीय वायुदलामार्फत दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अशी दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड टेस्टिंग हा दुसरा टप्पा पार पाडावा लागतो. 🔰 या अंतर्गत दोन टप्पे आहेत, ते पुढिलप्रमाणे : Stage 1 (पहिला टप्पा) : ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट Stage 2 (दुसरा टप्पा) : पिक्चर पर्सेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट 🔰 पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी संधी दिली जाते आणि पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्व...