Careers in Air Force - वायुदलातील करिअरर्स च्या सुवर्णसंधींचे प्रवेशद्ववार - AFCAT Entrance : ✈🚁 ©
भारतीय वायुदलाचा जगातील सर्वोत्कृष्ट वायुदलांमध्ये समावेश होतो. वायुदलाने गेल्या अनेक दशकतात, विविध युध्द आणि इतर आणिबाणिच्या प्रसंगात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. अशा ठिकाणी करिअरची संधी मिळणं, ही एक मोठीच कामगिरी ठरते. वायुदलामध्ये विविध प्रकारच्या सेवा-कार्यांसाठी दरवर्षी नियमितपणे भरती केली जाते. महत्वाकांक्षी आणि पराक्रम गाजवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी - तरुण - तरुणींनी या करिअर पर्यायाचा अवश्य विचार करावा/करायला हवा.
🔰AFCAT (एफकॅट): एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट- ही परीक्षा भारतीय वायुदलामार्फत दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अशी दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड टेस्टिंग हा दुसरा टप्पा पार पाडावा लागतो.
Stage 1 (पहिला टप्पा) : ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट
Stage 2 (दुसरा टप्पा) : पिक्चर पर्सेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट
🔰 पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी संधी दिली जाते आणि पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्वरित घरी पाठवले जाते.
Stage -4 (चौथा टप्पा) : (अखिल भारतीय गुणवत्ता यादी) - वैद्यकीय चाळणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची विविध शाखांमध्ये उपलब्ध जागांनुसार अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि या परीक्षेव्दारे पुढील नियुक्ती केली जाते-
(१) हवाई शाखा (फ्लाईंग ब्रँच):
- अर्हता – कोणत्याही विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
- किंवा ६० टक्के गुणांसह बीई/बीटेक किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण. या परीक्षेला विद्यापीठाची मान्यता प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २४ वर्षे असावे.
(२) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – एरॉनॉटिकल इंजिनीअर (इलेक्ट्रॉनिक्स) :
- अर्हता- बीई/बीटेक आणि १२वी मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले हवेत किंवा किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण किंवा ग्रॅज्युएट मेंबरशीप एक्झामिनेशन ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिक्यमुनिकेशन इंजिनीअर्सची परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
- (विषय सुची- कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, काम्प्युटर इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, काम्प्युटर इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, काम्प्युटर सायंस ॲण्ड इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल ॲण्ड काम्प्युटर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ईत्यादी.) या परीक्षेला विद्यापीठाची मान्यता प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.
(३) ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)– एरॉनॉटिकल इंजिनीअर (मेकॅनिकल) :
- अर्हता-१२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. बीई/बीटेक किंवा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट इन इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी किंवा असोशिएट मेंबरशीप ऑफ इंस्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)च्या परीक्षेतील ए आणि बी भाग (सेक्शन) उत्तीर्ण किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या परीक्षेतील ए आणि बी भाग उत्तीर्ण.
पुढील विषय किंवा शाखांमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक - एरोस्पेस इंजिनीअरिंग, एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, एअरक्रॉफ्ट मेंटनंन्स इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग ॲण्ड ऑटोमेशन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग-प्रॉडक्शन, मेकॅनिकल इंजिनीअरिंग – रिपेअर ॲण्ड मेंटनन्स, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग.
(४) ग्राउंड ड्युटी (अतांत्रिक) : – या अंतर्गत पुढील शाखांमध्ये निवड केली जाते.. 👇
अ) ॲडमिनिस्ट्रेशन (प्रशासन) शाखा : ६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील तीन वर्षे कालावधीची पदवी किंवा किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.
एज्युकेशनल (शैक्षणिक)-किमान अर्हता/पात्रता : एमबीए/एमसीए किंवा एमए/एमएस्सी इन इंग्रजी/ भौतिकशास्त्र/ गणित/ रसायनशास्त्र/ सांख्यिकी/ आंतरराष्ट्रीय अभ्यास- इंटरनॅशनल स्टडीज / आंतरराष्ट्रीय संबंध- इंटरनॅशनल रिलेशन्स/ डिफेन्स स्टडीज- सुरक्षा अभ्यास/ मानसशास्त्र/ संगणकशास्त्र/ माहिती तंत्रज्ञान- इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी/व्यवस्थापन/ मास कम्युनिकेशन/ पत्रकारिता/ जनसंपर्क
सर्व विषयांमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण आवश्यक. पदव्युत्तर पदवीचा कालावधी किमान दोन वर्षाचा असणे आवश्यक आहे.
इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी हा कालावधी कमी आहे. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक. उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.
ब) अकांउट्स (लेखा) शाखा : ६० टक्के गुणांसह बी.कॉम पदवी, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे,
क) लॉजिस्टिक्स (साधनसामग्री) शाखा : अर्हता-६० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी, किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षे असावे.
ड) मेटिऑरॉलॉजी शाखा: अर्हता- पुढील शाखांमधील पदव्युत्तर पदवी- गणित/ सांख्यिकी/ भुगोल/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ एन्व्हीराँमेंटल सायंस/ ॲप्लाइड फिजिक्स/ ॲग्रिकल्चरल मेटिऑरॉलॉजी/ इकॉलॉजी ॲण्ड एन्व्हीराँमेंट , एन्व्हीराँमेंटल बॉयलॉजी, जिओ फिजिक्स. पदव्युत्तर पदवीच्या सर्व पेपरमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. पदवी स्तरावर भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. या पेपरमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
अर्हता- ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि १२ वीमध्ये भौतिक शास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक. एनसीसी सिनिअर डिव्हिजन विंग मधील सी प्रमाणपत्र आवश्यक. उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे असावे.
या विषयघटकांवर प्रश्न विचारले जातात. न्युमरिकल ॲबिलिटी या घटकाचे प्रश्न हे दहावीच्या स्तरावरील असतात आणि इतर विषयघटकांचे प्रश्न हे पदवीस्तरावरील विचारले जातात/असतात.
🔰 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे : औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर
# Director & Globle Career Counsellor -
@ Wings To Explore, Education & Career Consultant - Nanded
📞 +91 91307 91257 / +91 91307 91666/ +91 98512 97555
Email: inquiry@wingstoexplore.com
www.wingstoexplore.com

Comments
Post a Comment